गेल्या चाळीस वर्षांत चीनने आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान कसे मिळवले आणि त्यामुळे चीन व जगापुढे काय प्रश्न निर्माण झालेत, याची चर्चा या पुस्तकात आहे

नियतीने चीन आणि भारत यांना एकत्र आणून ठेवले आहे. हे देश शेजारी असूनही या दोन देशांतील समाजांमध्ये फारसा संपर्क नाही. उलट दोन्ही देशांमध्ये १९६२च्या युद्धामुळे कटुता आहे. दोन्ही देशांत राष्ट्रवादाची तीव्र भावनाही आहे. चीनशी मोठा व्यापार असला तरी त्यातील चीनच्या वर्चस्वामुळे तो तणावपूर्ण वाटतो. चीनच्या वाढत्या आर्थिक आणि लष्करी प्रभावाच्या संदर्भात चीनने उभे केलेले आव्हान समजून घेणे आवश्यक आहे.......